Monday, June 9, 2008

shivdharma conference

speech by Dr.A.H Salunkhe in first shivdharma conference at tuljapur

पहिल्या शिवधर्म परिषदेतील डॉ.आ.ह.साळुंखे यांचे अध्यक्षीय भाषण......
तुळजापुर ,दि. २४-२५ ऑगस्ट २००२

बंधुभगिनीनो,
आत्ताचा क्षण हा आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक इतिहास निर्माण करणारा ,एक क्रांती घड़विनारा क्षण आहे ,संत तुकारामानी जो क्षण अनुभवताना "आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदचि अंग आनंदाचे" असे म्हटले आहे .त्या प्रकारचा क्षण आपण १२ जानेवारी २००५ रोजी आपलं प्रेरणास्थान असलेल्या जिजाऊ माऊलींच्या जयंतीदिनी अनुभवणार आहोत.आज या शिवधर्म परिषदेच्या रुपानं आपण त्या उत्कट अनुभवाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल टाकत आहोत.

मनुष्यत्वाला उन्नत करणारा शिवधर्म दृष्टीच्या टप्प्यात

हे पाऊल शिवधर्माच्या स्वरूपातील एका प्रसन्न,निर्मळ विश्वाच्या दिशेनं पडत आहे,एका अतीव देखण्या सृष्टिच्या दिशेनं पडत आहे,या जाणीवेने आज आपण सर्वजण रोमांचित झालो आहोत.प्रदीर्घ काळ गडध अंधारात राहिल्या नंतर तिथून बाहेर पडावं आणि निरामय प्रकाशानं उजलून निघालेल्या एका ताज्या टवटवीत जगात प्रवेश करावा,अशी आपली स्थिति झाली आहे.आपण आरपार हरखून गेलो आहोत.आपल्या अस्तित्वाचा अणु-रेणू एका आनंदमय सुगंधानं दरवलू लागला आहे.आज आपण एका उत्कट भावना वेगाने उत्तेजित उल्लासित झालो आहोत,आज आपल्या मनुष्यत्वाला उन्नत आणि उदात्त बनविनारा शिवधर्म दृष्टीच्या टप्प्यात आल्याचं पाहून त्याला प्रत्यक्षरित्या प्राप्त करण्यासाठी उतावीळ झालो आहोत, उत्सुक -उत्कंठित झालो आहोत.

हा आपल्या सामूहिक विवेकचा परिपाक

या शिवधर्माची काही वैशिष्टे आहेत,येथे आपल्यापैकी कुणीही एक व्यक्ति धर्मसंस्थापक,धर्मगुरु व धर्मपुरोहित नाही.या धर्माची निर्मीती ईश्वराच्या कोणा अवताराने वा दूताने केलेली नाही.या धर्मामधली जीवनशैली म्हणजे सर्वांच्या सामूहिक विवेकाचा परिपाक आहे. या धर्माच्या नियमांमध्ये आपल्या सर्वांच्या नैतिक जाणिवा प्रतिबिंबित होणार आहेत.या धर्माच्या मुल्यांमध्ये आपल्या सर्वांच्या ह्रदयातील धर्मविषयक स्पंदने प्रतिध्वनित होणार आहेत.

गेली कित्येक वर्षे आपल्यापैकी असंख्य व्यक्ति वेगवेगळया पातळयावरून धर्मविषयक चिंतन करीत आहेत. पुढची दोन अडीच वर्षही ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु राहील. आता पर्यंत अनेकांनी या बाबतीत जे धर्मचिंतन केलं आहे,ते आपल्या सर्वांच्या चिंतनासाठी मी इथं आपल्यापुढं ठेवत आहे.

जिजाऊ हे प्रेरणा स्थान

आपण जिजाऊंना प्रेरणा स्थान मानत आहोत,याचा अर्थ आपण एकीकडून स्त्रित्वाचा यथोचित आदर आणि गौरव करीत आहोत,तर दूसरीकडून मात्रूत्वाचा एक उत्तुंग आदर्श सर्वांपुढं ठेवत आहोत. जिजाऊंनी शिवबाच्या मनावर माणूसकीचे आणि नैतिकतेचे संस्कार केले,संकटावर आणि प्रतिकुल परीस्थितिवर मात करण्याचं धैर्य त्यांच्या मनात फुलवलं, त्यांना प्रजेच्या हितात स्वतःचं हित मानायला शिकवलं, आपल्या या छोट्याश्या बालाचं एका मोहरलेल्या-बहरलेल्या व्यक्तिमत्वात रूपांतर केलं.आपली सर्वांची अशी इच्छा आहे की, आपल्या घरा-घरातील मातांनी मुलामुलींवर अशाच प्रकारचे संस्कार करावेत आणि अवघा समाज नैतिकतेवर अधिष्ठित कर्तुत्वाने उजलुन निघावा.


शिवधर्माचा गाभा : देण्या घेण्याचं माप एकच.

आपलं देण्याचं आणि घेण्याचं माप एकच असावं, असं बहुजन समाजाला गडद अंधारातुन प्रकाशाकडे आणण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालनारया महात्मा फुले यांनी म्हटले आहे, आपण कुणाचा अन्याय सहन करायचा नाही आणि आपणही कुणावर अन्याय करायचा नाही, आपली फुलण्याची संधि कुणाला रोखू द्यायची नाही आणि आपणही कुणाची फुलण्याची संधि रोखायची नाही,हा त्यांच्या ह्या म्हणण्याचा आशय आहे. जिजाऊंनी शिवबावर केलेल्या संस्कारांचा आशय ही नेमका हाच होता म्हणूनच,रयतेच्या शेतातील भाजीच्या देठालाही हात लावू नका, अशा अर्थाचे आदेश आपल्या अधिकारयाना देण्याची उच्च नैतीकता छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर आपल्या कृतितुन व्यक्त केली. स्वाभाविकच आपल्या शिवधर्माचा गाभा म्हणून आपण हा आशय स्वीकारने उचित ठरनार आहे

हा स्वयं निर्णयाचा अधिकार

आपला हा प्रयत्न कुणाच्या विरोधात नाही,आपण हे पाऊल कुणाच्या द्वेषातुन उचलेलं नाही, हा आपल्या धार्मिक स्वातंत्र्याचा उदघोष आहे,आपल्या सांस्कृतिक अस्मितेचा उदगार आहे, प्रत्येक मानव समुहाला एका निकोप धर्माची आवश्यकता असते,आपल्या सर्वांनाही असा धर्म हवा आहे, शिवधर्माचा अविष्कार म्हणजे आपला धर्म कसा असावा याविषयी आपण सर्वांनी वापरलेला स्वयंनिर्णयाचा अधिकार आहे .


आपण आपलं स्वतःचं घर बांधत आहोत.

खरं तर ही सधी सरळ गोष्ट आहे, आपण आपलं स्वतःचं घर बांधत आहोत, स्वतःचं घर बांधने हा काही गुन्हा नव्हे, की कुठल्या तरी कोंडवाड्याच्या मालकाचा द्वेष नव्हे, आपल्या या घराचा पाया कसा आणि किती असावा, त्याला मजले किती असावेत,त्याला दारं खिडक्या किती आणि कशा असाव्यात, भिंतीचा आणि खिडक्यांच्या पड़द्यांचा रंग कसा असावा, ते आता आपण आपलं ठरवू. भिंतीवर प्रतिमा वामन आणि परशुराम यांच्या लावायच्या,की महात्मा बलिराजा आणि राजर्षी शाहू यांच्या लावायच्या,याचा निर्णय आता आपण घेवू या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या घरातल्या माणसांचे संबंध एकमेकांशी आणि इतरांशी कसे असावेत, हे ठरविन्याचं आपलं स्वातंत्र्य, त्या स्वातंत्र्यात आपल्या घराचं खरंखुरं घरपण असेल, आपण या बाबतीत इतरांचं विधायक मार्गदर्शन आणि सहकार्य नाकारणार नाही.पण कुणी आपलं निर्णय स्वातंत्र्यच खुडून टाकू असं म्हणत असेल, तर मात्र आपण ते कुठल्याही परिस्थितीत मान्य करणार नाही.

धार्मिक स्वातंत्र्याची घोषणा करणचं योग्य.

कोट्यावधी लोकांचा एखादा जनसमूह आपला धर्म कसा असावा याविषयी एक अक्षरही उच्चारू शकत नाही. कुणीतरी बाहेरून लादलेली मूल्यं म्हणजे आपला धर्म असं त्याला मानावं लागतं, ही काही गौरवास्पद गोष्ट नव्हे.


शिवधर्म : निर्मळ-निरामय समाज रचनेचं स्वप्न.

मानव जीवनात जे जे उत्तम, उदात्त, निकोप, न्यायचं, माणुसकिचं आणि मानवाच्या सर्व अंतःशक्ति विधायक मार्गाने फुलवनारे असं असतं, ते "शिव" या संकल्पनेत अंतर्भुत होतं.

शिवधर्मात जातिभेद असणार नाही.

या धर्माची भूमिका मान्य असणारया कुणालाही ह्या धर्मात प्रवेश करता येईल.येथे कोणत्याही प्रकारचा वर्णभेद वा जातिभेद असणार नाही, जातीपातिच्या वा पोटजातीच्या आधारे रोटी बेटी व्यवहारात कसलाही अडथला आणला जाणार नाही.

शिव धर्मा मध्ये ईश्वरावर श्रद्धा असलेल्या आणि नसलेल्या अशा सर्वांचं स्थान बरोबरीचं असेल;असं असलं,तरी ईश्वरावर श्रद्धा असणारयानी ईश्वराच्या आपल्या संकल्पनेला अज्ञान,शोषण,विषमता अशा प्रकारचे घटक चिकटणार नाहीत,याची दक्षता घ्यावी.याबाबतीत संत तुकारामांनी 'जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले तोची साधू ओलखावा

कोणत्याही धार्मिक कृत्यात ब्राम्हण भटजीला बोलवायचं नाही.

चिकित्सेचं स्वातंत्र्य अबाधित राहिल.

विज्ञानाने शोधलेल्या सत्याचं स्वागत.

धार्मिक स्वातंत्र्यामुलं सर्व स्वातंत्र्य मिळतील.

विवेक हे धर्माचं अंतरंग.


संकलन -

डॉ.सुभाषराव कदम.

तालुका शिवधर्म समन्वयक


tags-
shivdharma ,maratha seva sangh,sambhaji brigade,jijau brigade,jijau,jijamata.jijabai,shivaji,sambhaji,maratha,purushottam khedekar,dr.a.h.salunkhe,shivdharm